गोविंदराव वंजारी कॉलेजमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण

    दिनांक :09-May-2026
Total Views |
नागपूर,
Govindrao Vanjari College गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या उत्कृष्टता केंद्र आणि प्रशिक्षण व नियुक्ती विभागातर्फे SEED Infotech व GTT Foundation यांच्या सहकार्याने २४ तासांचे कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध शाखांतील १२५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षम कौशल्यांचा विकास आणि उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार त्यांना तयार करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रभावी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले होते.

manoj 
 
 
प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक ज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता आणि करिअर तयारी यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रम डॉ. सलीम चव्हाण आणि डॉ. राकेश श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. Govindrao Vanjari Collegeप्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. अनिल तिजारे यांनी अशा उद्योगाभिमुख उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व रोजगार क्षमता वाढत असल्याचे सांगितले. तसेच उदय गोंधळेकर यांनी संवाद कौशल्य आणि तांत्रिक प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले.विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाला १० पैकी १० गुण दिले.
सौजन्य :मनोज वैराळकर,संपर्क मित्र