हिंगणघाट,
dr gharote कॅन्सर उपचार क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत नाशिकमधील मूळचे हिंगणघाटचे डॉ. मुकुल अरविंद घरोटे यांनी औषध देण्याच्या वेळेचा रुग्णांवर होणार्या दुष्परिणामांवर मोठा प्रभाव पडतो, असा निष्कर्ष मांडला आहे. डॉ. मुकुल घरोटे यांच्या नेतृत्त्वाखालील या अभ्यासाचे सादरीकरण आंतरराष्ट्रीय परिषदेत करण्यात आले आहे.
या संशोधनात पल्बोसिलिब या सीडीके ४/६ इनहिबिटर औषधाच्या वेळेनुसार समायोजित डोसिंगचा अभ्यास करण्यात आला. हे औषध मुख्यतः स्तनाच्या कॅन्सरमध्ये वापरले जाते, मात्र त्याचा एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे हाडमज्जा दमन (बोन मॅरो सप्रेशन), ज्यामुळे रुग्णांमध्ये न्युट्रोपेनिया (पांढर्या रतपेशी कमी होणे) आढळतो. नाशिकमधील मुता कॅन्सर लिनिक या केंद्रात करण्यात आलेल्या या केस सिरीजमध्ये रुग्णांना ठराविक वेळेत औषध देण्यात आले आणि त्याचा परिणाम नोंदवण्यात आला. अभ्यासात असे दिसून आले की औषध देण्याची योग्य वेळ निवडल्यास दुष्परिणामांची तीव्रता कमी होऊ शकते.
या संदर्भात डॉ. मुकुल घरोटे यांनी काढलेल्या मुख्य निष्कर्षनुसार, सर्व रुग्णांनी उपचार चांगल्या प्रकारे सहन केले. गंभीर (ग्रेड ४) न्युट्रोपेनिया अत्यल्प रुग्णांमध्ये आढळून आला. डोस कमी करण्याची गरज कमी भासली. मुख्य म्हणजे, संसर्गाचा धोका कमी झाल्याचे निरीक्षण त्यांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या कर्करोग रुग्णाचे निरीक्षण करून काढले.
यामागील विज्ञानविषयावर बोलताना डॉ. घरोटे यांनी सांगितले की, मानवी शरीरात जैविक घड्याळ असते. हाडमज्जेतील पेशींची वाढ आणि कार्य या घड्याळाशी संबंधित असते.dr gharote त्यामुळे औषध योग्य वेळी दिल्यास ते कॅन्सर पेशींवर अधिक प्रभावी ठरते आणि निरोगी पेशींवरील दुष्परिणाम कमी होतात.
डॉ. मुकुल घरोटे यांच्या मते, हा अभ्यास कॅन्सर उपचारातील एक महत्त्वाचा बदल ठरू शकतो. डोस किती द्यायचा या इतकंच औषध कधी द्यायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, असे मत व्यत केले. या संशोधनावर पुढील दिशा काय असावी, यावर डॉ. मुकुल घरोटे यांच्या मतानुसार, या निष्कर्षांना अधिक बळकटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मल्टी-सेंटर लिनिकल ट्रायल्सची आवश्यकता आहे. मात्र, हा अभ्यास भविष्यातील कर्करोगावरील दिशा दर्शवणारा ठरू शकतो, असे मतही त्यांनी व्यत केले.