नागपूर
Mother's Day मातृप्रेम आणि त्यागाचे अनोखे उदाहरण समोर आले असून सुनंदा सुहास नेमाडे यांनी आपल्या मुलाला किडनी दान करून त्याला नवजीवन दिले आहे. त्यांचे पुत्र राहुल सुहास नेमाडे यांनी मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर आपल्या भावना व्यक्त करत आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
राहुल नेमाडे यांना गंभीर आजारामुळे किडनी प्रत्यारोपणाची गरज निर्माण झाली होती. आजारपणामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत असताना त्यांच्या आईने कोणताही विचार न करता स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर राहुल यांना नवजीवन मिळाले. Mother's Day राहुल यांनी सांगितले की, “आईने केवळ माझे प्राण वाचवले नाहीत, तर माझ्या कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य वाचवले. तिच्या त्यागामुळे मला पत्नी, मुलगा आणि कुटुंबासोबत आयुष्य आनंदाने जगण्याची दुसरी संधी मिळाली.”मदर्स डे निमित्त त्यांनी सर्वांना आपल्या आईचा सन्मान करण्याचे आणि अवयवदानाबाबत जागरूक होण्याचे आवाहन केले.
सौजन्य:हेमंत आंबासेलकर ,सीमा मुनशी,संपर्क मित्र