वाशीम,
transfers washim police force वाशीम जिल्हा पोलिस दलात ३० एप्रिल २०२६ रोजी तत्कालीन पोलिस अधीक्षक यांनी एकाच वेळी १८ पोलीस अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या सहमतीने हे आदेश देण्यात आले असून, यामध्ये प्रामुख्याने पोलिस मुख्यालय आणि विविध स्थानिक शाखांमधील कर्मचार्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार, या बदल्या ’अपवादात्मक परिस्थिती’ आणि ’विशेष कारणांच्या’ अनुषंगाने करण्यात आल्याचा उल्लेख आदेशात आहे. मात्र, पोलिस विभागात या शब्दांच्या प्रयोगावरून सध्या सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशी नेमकी कोणती अपवादात्मक परिस्थिती उद्भवली किंवा कोणती विशेष कारणे यामागे होती, याबाबत आता विविध तर्क-वितर्क लढवले जात असून, पोलिस वर्तुळात या बदल्या धक्कादायक मानल्या जात आहेत.
विशेष म्हणजे या सर्व बदल्या प्रशासकीय नसून संबंधित कर्मचार्यांच्या विनंतीवरून करण्यात आल्या आहेत.transfers washim police force बदली झालेल्या कर्मचार्यांना तात्काळ कार्यमुक्त करून त्यांच्या हजर व कार्यमुक्त अहवालाची माहिती कार्यालयास सादर करावी. या बदल्यांमागील विशेष कारणांची चर्चा मात्र सध्या जिल्ह्यात जोरात सुरू आहे.