चंद्रपूर,
Maharashtra Legislative Council Election महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी सोमवार, 12 जून रोजी आपला नामांकन अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला.
Maharashtra Legislative Council Election यावेळी राज्यमंत्री तथा निवडणूक प्रमुख पंकज भोयर, पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोटेकर, पदवीधर निवडणूक नोंदणीचे सहप्रमुख सुधीर दिघे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, आ. किर्तीकुमार भांगडिया, आ. किशोर जोरगेवार, आ. समीर कुणावार, आ. देवराव भोंगळे, आ. करण देवतळे, आ. मिलिंद नरोटे, आ. श्रीकांत भारती, माजी खासदार अशोक नेते, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार सुदर्शन निमकर, देवराव होळी, माजी आमदार अविनाश वारजूरकर, महापौर संगीता खांडेकर आदी उपस्थित होते. अरुण लखाणी यांनी, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.