लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
वाशीम,
Raid on a Liquor Den तालुयातील अनसिंग पोस्टे अंतर्गत येत असलेल्या मोहगव्हाण येथील धरणाचे काठावरील अवैध गावठी दारु अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने छापा मारुन लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. वाशीम जिल्हामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्या करीता पोलिस विभागाकडुन कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी अवैद्य दारु, जुगार, गुटखा तसेच शस्त्र अधिनियम प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगारांना वचक निर्माण करण्याबाबत पोलिस विभागाला सुचना दिल्या आहेत.
पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानीक गुन्हे शाखा यांना अनसिंग पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम मोहगव्हाण येथील धरणाचे काठावर काही लोक गावठी हातभट्टी ची दारु गाळतात अशी माहीती मिळाल्या वरुन १ जून रोजी स्थानीक गुन्हे शाखा वाशीम चे पथकाने ग्राम मोहगव्हाण येथील धरणाचे काठावर गावठी हात भट्टी दारु गाळणारे इसमांव छापा टाकला असता तेथील आरोपीना पोलिस आल्याची चाहुल लागताच ते घटनास्थळा वरुन पसार झाले. परीसराच पाहणी केली असता झाडझुडुपात, तलवाच्या काठावर लपवुन ठेवलेला तसेच जमिनीमध्ये गड्डा करुन पुरुन ठेवलेल्या सडवा, मोहमाचचे २०० लिटरचे २७ ड्रम व १५ लिटरचे २१ पिपे ज्यामध्ये असा एकुन ५,४०० लिटर मोहामाच व १५ लिटरच्या २ प्लास्टिक कँन ज्यामध्ये ३० लिटर गावठी हातभट्टी दारु असा एकुण ५ लाख ७४ हजार ५०० रुपयाचा माल मिळुन आला. सदर माल पंचासमक्ष नाश करण्यात आला.
Raid on a Liquor Den या्रकरणी फरार आरोपी आमिर मोहम्मद नौरंगाबादी रा. मोहगव्हाण यांचे विरुद्ध कलम ६५ (ई) (फ) मु.प्रो. कायद्यान्वये पोलिस स्टेशन अनसिंग येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस स्टेशन मानोरा हद्दीत ग्राम कार्ली येथे आरोपी अमर दादाराव राउत यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन ३५० लिटर सडवा मोहामाच किंमत ५२ हजार ५०० रुपये व ३० लिटर गावठी हातभट्टीची दारु किंमत अंदाजे ६ हजार रुपये असा एकुण ५८ हजार ५०० रुपयचा मुद्देमाल हस्तगत करुन पोलिस स्टेशन मानोरा येथे आरोपी विरुध्द विरुद्ध कलम ६५ (ई) (फ) मु.प्रो. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांनी एकाच दिवशी ६ लाख ३३ हजार रुपयाचा गावठी हातभट्टी दारु नष्ट केली. सदर कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षिरसागर, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि जगदिश बांगर, पोउपनी शेखर मास्कर व स्थानिक गुन्हे शाखा वाशीमच्या पथकाने केली.