रोहणा ग्रामपंचायत उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव दाखल

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
राजकीय हालचालींना वेग
मानोरा, 
Rohana Gram Panchayat तालुयातील रोहणा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र रामराव राऊत यांच्याविरोधात सरपंचसह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केल्याने तालुयातील राजकीय वातावरण तापले आहे. प्राप्त माहितीनुसार, रोहणा ग्रामपंचायतीच्या सरपंचसह ५ सदस्यांनी १ जून रोजी तहसीलदार, यांच्याकडे अविश्वास ठरावाची नोटीस सादर केली. या नोटीसद्वारे विकास कामे न करणे, ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यास असमर्थता दाखवणे व उपसरपंचावर विश्वास राहिला नसल्याचा आरोप करत सदस्यांनी हा ठराव मांडला आहे. या ठरावावर सरपंच प्रभावती देशमुख, सदस्या विमला तुकाराम मोहाडे, प्रीतम जगदीश डोलारकर, ललिता मोतीराम पवार, प्रज्ञा नितीन भारसाकळे, उषा किशोर शिंदे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार नियमानुसार विशेष सभा बोलावून अविश्वास ठरावावर विचार करण्याची विनंती अर्जदार सदस्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
 
 
gram
 
Rohana Gram Panchayat  नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे उपसरपंच यांच्यावर सदस्यांचा विश्वास राहिलेला नाही. विकास कामे केली जात नाहीत, ग्रामस्थांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत, असा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नियमानुसार आता तहसीलदारांना ७ दिवसांत विशेष सभा बोलवावी लागणार आहे. या सभेत बहुमताने ठराव मंजूर झाल्यास उपसरपंच यांना पायउतार व्हावे लागेल. या अविश्वास ठरावामुळे रोहणा ग्रामपंचायतीतील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला असून पुढील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण तालुयाचे लक्ष लागले आहे.