रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा थाटात

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा सीएसआर

उमरखेड, 
Inauguration of the ambulance नागपूर मुख्यालय असलेल्या फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने सीएसआर अंतर्गत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उमरखेड येथे पार पडला. रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात झाला. सोहळ्याचे उदघाटन आमदार किसन वानखेडे यांनी केले.
 
 
lokapasdk
 
जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक तथा विविध उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात राबवल्या जात आहेत. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा अविरत देण्याचा प्रयत्न असून याचाच एक भाग म्हणून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संचालक नितीन भुतडा यांनी केले. यावेळी बोलताना भुतडा म्हणाले, सामाजिक उपक्रमाचे सातत्य संस्थेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशचेसुद्धा मी या रुग्णवाहिकेसाठी आभार मानतो.
 
 
 
यावेळी मंचावर यावेळी बाजार समिती सभापती कृष्णा देवसरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष सुदर्शन रावते, जय तुळजाई बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेचे पवन धुरट, प्रकल्प अधिकारी आकाश धुरट, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष बळवंत नाईक, विक्रम राठोड, नगरसेवक गोपाळ कलाने, जीन प्रेस उपाध्यक्ष जितेंद्र पवार, नगरसेवक अमोल तिवरंगकर, बाजार समिती संचालक राधेश्याम भट्टड, विवेक कन्नावार, निधी भुतडा, नगरसेवक वंदना घाडगे, जोत्स्ना रुडे, महिला अध्यक्ष शितल धोंगडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड. अनिल माने यांनी, सूत्रसंचालन विजय गुजरे आणि आभारप्रदर्शन गजानन मोहळे यांनी केले.
 
77 ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत पूर्ण
दारव्हा : दारव्हा तालुक्यातील 77 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत शुक्रवारी झाली. या ग्रामपंचायतमधील प्रभागनिहाय आरक्षण निश्चित केले असून ग्रामीण भागात गावपुढाèयांचे ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण हक्काच्या प्रभागामध्ये आरक्षण वेगळे निघाले तर इतरत्र प्रभागात भविष्य अजमावण्याची वेळ आली आहे. यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून तहसील विभाग कृषी विभाग, पंचायत समिती विभाग यांनी काम पाहिले. वरील प्रक्रिया तहसीलदार राजेश पऊळ यांच्या मार्गदर्शनात झाली असून यासाठी निवासी नायब तहसीलदार आंबेकर, नायब तहसीलदार, कर्मचारी मिळाले, अशी माहिती तहसीलदार गजानन गुल्हाने यांनी दिली.