आता सागर दानडे यांच्याकडे
मारेगाव,
मारेगाव पोलिस ठाणेदार श्याम वानखेडे यांची बदली झाल्यामुळे नवीन ठाणेदार म्हणून Sagar Dandade सागर दानडे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सागर दानडे यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर नियंत्रण ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद, अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाई आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे हे आपल्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ठाणेदार श्याम वानखेडे यांनी आपल्या कार्यकाळात विविध गंभीर गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावत कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पोलिस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्याचे कार्यही त्यांनी केले. मारेगाव पोलिस ठाण्याच्या नेतृत्वातील बदलामुळे पोलिस प्रशासनात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना आहे. व्यापारी, सामाजिक संघटना, नागरिक तसेच राजकीय वर्तुळाला नव्या ठाणेदारांकडून पारदर्शक, जनाभिमुख आणि परिणामकारक पोलिसिंगच्या अपेक्षा आहेत. नवे नेतृत्व, नवी दिशा आणि गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका या अपेक्षांसह सागर दानडे यांच्या कार्यकाळाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून या प्रशासकीय निर्णयामुळे पोलिस यंत्रणेला नवचैतन्य मिळण्याची शक्यता आहे.