मुंबई
pranit more comedy show कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या डॉ. सेजल पवार यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. मृतदेहासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि असंवेदनशील टिप्पणीप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालात त्यांच्या वक्तव्यावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला असून त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रणित मोरे यांच्या कॉमेडी शोदरम्यान उपस्थित असलेल्या डॉ. सेजल पवार यांनी मृतदेहाच्या खासगी अवयवांबाबत केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित व्यक्तीकडून अशा प्रकारचे वक्तव्य होणे अयोग्य असल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त करण्यात आल्या.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन केईएम रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने संबंधित कॉमेडी शोचे संपूर्ण रेकॉर्डिंग पाहून प्राथमिक अहवाल सादर केला. या अहवालात डॉ. पवार यांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह आणि असंवेदनशील असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.वाद वाढल्यानंतर डॉ. सेजल पवार यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसिद्ध करून सार्वजनिक माफी मागितली होती. तसेच रुग्णालय प्रशासनालाही त्यांनी लेखी माफीनामा सादर केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, माफी मागितल्यानंतरही प्रशासनाने चौकशी सुरू ठेवली असून प्राथमिक निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या डॉ. पवार या pranit more comedy show अधिकृत परवानगी घेऊन रजेवर आपल्या गावी गेल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संवेदनशीलतेला बाधा पोहोचविणारे वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे कॉमेडी शोमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विनोदाची मर्यादा आणि व्यावसायिक जबाबदारी यावर नव्याने चर्चा सुरू झाली असून चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.