टीसीएस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी सुरू

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
पुणे,
Suicide टीसीएस कंपनीतील कर्मचारी अमित अभय ब्रह्मे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, पोलिसांनी या प्रकरणात कंपनीतील काही कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मानसिक त्रास देणे आणि बदनामीकारक ई-मेल पाठवणे अशा आरोपांवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 

Suicide
भोसरी पोलिस Suicide  ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, विनोद जेठालाल पालीचा, अर्चना आणि शाश्वती (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या तिघांनी अमित ब्रह्मे यांना मानसिक त्रास दिल्याचा तसेच त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे ई-मेल पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी टीसीएस कंपनीशी पत्रव्यवहार केला असून संबंधित तीन संशयित कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. या चौकशीनंतर प्रकरणातील काही महत्त्वाची तथ्ये स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, टीसीएस कंपनीने या घटनेबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीने अमित ब्रह्मे यांच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे सांगितले आहे. तसेच कर्मचाऱ्यांविरोधातील आरोपांची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे Suicide कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तपास सुरू असल्याने सध्या यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. संबंधित यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केले जात असल्याचे टीसीएसने नमूद केले असून, चौकशीनंतरच पुढील भूमिका स्पष्ट होईल असे संकेत दिले आहेत.