मुंबई
Vidhan Parishad election महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज, १८ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील विविध केंद्रांवर सकाळपासून मतदानाला प्रारंभ झाला आहे. नाशिक, सांगली, कोकण, सातारा आणि नागपूर या महत्त्वाच्या विभागांतील जागांसाठी ही निवडणूक होत असून राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, या निवडणुकीत महायुतीने आधीच मोठी आघाडी घेत ११ पैकी ६ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे उर्वरित जागांसाठीच प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडत असून सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
यंदाच्या निवडणुकीत ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून भाजपचे प्राजक्त तनपुरे विजयी झाले आहेत.
तिरंगी लढत
सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र Vidhan Parishad election राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे वसंतराव देशमुख यांच्यात सामना आहे. जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन, ठाकरे गटाचे शरद तायडे आणि बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे आमनेसामने आहेत.नाशिक मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे रिंगणात असले तरी माघार घेतलेल्या गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांची नावेही मतपत्रिकेवर कायम असल्याने निवडणुकीत वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदान प्रक्रियेसाठीVidhan Parishad election निवडणूक आयोगाने आवश्यक ती सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्था केली असून सकाळपासूनच आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर हजेरी लावली. प्रत्येक मताचे महत्त्व लक्षात घेता, विविध पक्षांचे नेते आणि उमेदवार सतत संपर्कात राहून मतदारांशी संवाद साधत आहेत.या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवरील सत्तासंतुलनावर परिणाम करणाऱ्या या निकालामुळे आगामी राजकीय घडामोडींना दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असून कोणत्या पक्षाला किती यश मिळते याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.