अखेर धर्मांतरण प्रकरणातील मौलवीला अटक

दोन आरोपींच्या कोठडीत वाढ

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,

religious conversion धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात सोनेगाव पोलिसांना मोठे यश मिळाले असून, या प्रकरणातील तिसरा आरोपी मौलवी हजरत महमूद मकसूद (३८, तामिया-छिंदवाडा) याला बुधवारी उशिरा रात्री अटक करण्यात आली. त्यामुळे या गाजलेल्या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी तिघेही आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. यापूर्वी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या दोन्ही आरोपींना पाच दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
 

religious conversion case Nagpur 
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील तामिया परिसरात हजरत मौलवी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सोनेगाव पोलिसांचे विशेष पथक तेथे रवाना झाले होते. महिलेच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी शोधमोहीम राबविली होती. याच ठिकाणी महिलेवर धर्मांतरणासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, त्यावेळी मौलवी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, सततच्या शोधमोहीमेनंतर बुधवारी रात्री अखेर सोनेगाव पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात यापूर्वीच कळमेश्वर येथील अय्याज ताज मदारे (२६) आणि अमीन शेख (३०) यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी पुन्हा मंजूर केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील धर्मांतरण, लैंगिक शोषण, आर्थिक व्यवहार तसेच इतर संभाव्य संबंधित व्यक्तींचा तपास सुरू असून, अटकेत घेतलेल्या मौलवीकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोनेगाव पोलिस करीत आहेत.
 
 

‘त्या’ तरुणीचा जबाब नोंदविला
छिंदवाड्यातील एका हॉटेलमध्ये religious conversion महिलेचे धर्मांतरण करताना एका तरुणीने मोबाईलने व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ त्या तरुणीने सोशल मिडियावर व्हायरलसुद्धा केला होता. त्यामुळे त्या तरुणीला पोलिसांनी आज बुधवारी पोलिस ठाण्यात बोलावले होते. तिचा जबाब पोलिसांनी नोंदवला. तसेच एका साक्षिदार तरुणाचाही पोलिसांनी जबाब नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली.