त्रिमूर्ती नगरातील विविध मंदिरांत महाआरती उत्साहात

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नागपूर,
trimurti nagar भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त भाजपा आध्यात्मिक आघाडी आणि हिंदू धर्म सुरक्षा समिती, नागपूर महानगर यांच्या वतीने त्रिमूर्ती नगर परिसरातील विविध मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले. गजानन महाराज मंदिर, नवग्रह मंदिर (शहाने लेआउट) तसेच एम.आय.जी. कॉलनीतील हनुमान मंदिर येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी तीनही मंदिरांचे अध्यक्ष, सहसचिव, पुजारी, प्रभाग ३६च्या नगरसेविका माया ताई हाडे तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
 
trimurti nagar
 
सर्वांनी एकत्रितपणे महाआरती करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रम साजरा केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन भाजपा आध्यात्मिक आघाडी, नागपूर महानगरच्या महामंत्री सौ. सपना रोडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आध्यात्मिक आघाडीचे उपाध्यक्ष समीर देशपांडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम शेंडे, मंत्री कल्पना डोंगरे तसेच सुनीता बेबोर्टा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सौजन्य: सपना रोडी, संपर्क मित्र