तारक मेहता का उल्टा चष्माचे थांबले अचानक 'शूटिंग'

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर नुकताच एक अत्यंत भावनिक प्रसंग घडला. मालिकेत बाघाची भूमिका साकारणारे अभिनेता तन्मय वेकारिया शूटिंगदरम्यान अचानक भावूक झाले आणि ढसाढसा रडू लागल्याने काही काळासाठी चित्रीकरण थांबवावे लागले. या प्रसंगी निर्माते असित मोदी यांनी स्वतः पुढे येत तन्मय यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले.
 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 
मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय वेकारिया एका सीनचे चित्रीकरण करत होते, जो बाघा आणि बावरी यांच्या प्रेमकथेशी संबंधित होता. मात्र कॅमेरे सुरू होताच ते अचानक भावनिक झाले आणि त्यांच्या आईच्या आठवणींनी त्यांना गहिवरून आले. त्यामुळे सेटवरील वातावरणही काही क्षणांतच गंभीर झाले.तन्मय यांच्या आईचे 2025 मध्ये निधन झाले होते. आईला त्यांची बाघाची भूमिका अत्यंत आवडत असे आणि ते नियमितपणे मालिकेतील भाग पाहण्यासाठी उत्सुक असायच्या. या भूमिकेमुळे मिळणारे प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुक पाहून त्यांची आई खूप आनंदी व्हायची, असे तन्मय यांनी यापूर्वीही सांगितले आहे. त्यामुळे त्या सीनदरम्यान आईची अनुपस्थिती अधिक तीव्रतेने जाणवली आणि भावना अनावर झाल्या.या भावनिक प्रसंगामुळे सेटवरील इतर कलाकार आणि क्रू सदस्यही हेलावून गेले. अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले आणि काही काळासाठी संपूर्ण शूटिंग थांबवण्यात आले. त्यानंतर असित मोदी आणि टीममधील इतर सदस्यांनी पुढे येऊन तन्मय यांना आधार दिला.
यापूर्वीही तन्मय वेकारियाTaarak Mehta Ka Ooltah Chashmah,  यांनी सोशल मीडियावर आईबद्दलच्या आठवणी शेअर करत त्यांच्या निधनानंतरच्या भावनिक अवस्थेबाबत व्यक्त केले होते. ‘मी आता आईला प्रत्यक्ष भेटू किंवा मिठी मारू शकणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी आपली वेदना व्यक्त केली होती.‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा अविभाज्य भाग ठरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, अशा पडद्यामागील भावनिक क्षणांनी कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील नातं अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येते.