केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
संग्रामपूर, जळगांव तालुयाला अवकाळी वादळी पावसाचा फटका
 
बुलडाणा, 
Union Minister of State Prataprao Jadhav बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर, जळगांव जामोद तालुयात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे केळी, संत्रा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक घरावरचे टिनपत्रेही उडून गेली आहेत या वादळी अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानींचे तात्काळ पंचनामा करण्याच्या निर्देश केंद्रीय राज्यमंत्री खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
 
 
pratap
 
बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर आणि जळगांव जामोद या तालुयामध्ये १ जुनच्या सांयकाळी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे संग्रामपूर तालुयातील सोनाळा, सावळा, अकोली, चांगेफळ, निवाना, रुधाना, वकाना, पळशी झाशी, बावनबीर, टुनकी, काकनवाडा, वरवंड यासह अन्य गावामध्ये शेतातील केळीचे नुकसान झाले आहे. संग्रामपूर तालुयात सुमारे ६०० हेटर शेतजमीनीवरील केळी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केळी बागायतदार शेतकर्‍यांचे या वादळी पावसामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जळगांव जामोद तालुयातही या वादळी पावसाचा फटका शेतकर्‍यांना बसला असून सुमारे ४५० हेटर शेतजमीनीवरील केळींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी संत्रा पिकांचेही नुकसान झाले आहेत तर अनेक शेतकर्‍यांचे घरावरचे व गोठयावरचे टिनपत्रे उडून गेल्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश केंद्रीय आयुष आरोग्य व कुंटूब कल्याण राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी प्रविण देवरे यांना दिले आहेत.