पळविलेल्या अल्पवयीन युवतीची सुटका

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
इन्स्टाग्रामवरून टाकले होते प्रेमाचे जाळे
 
अंजनगाव सुर्जी, 
Case involving the deception of a girl इन्स्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीची सुखरूप सुटका केली आहे. सदर मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.
 
 
yuvati
(संग्रहित छायाचित्र)
 
स्थानिक अजितपुरा भागातील राहणारी अकराव्या वर्गातील ही मुलगी १४ जून रोजी घरातून बेपत्ता झाली होती. मुलीच्या आईने अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात १५ जून रोजी तक्रार दाखल केली. तपासात समोर आले की, मुलीची ४ महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर एका १९ वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. सदर तरुणाने मुलीशी जवळीक साधली व तिला लग्नाचे आमिष दाखवून पळून जाण्यास प्रवृत्त केले. अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुलीच्या इन्स्टाग्राम चॅट व मोबाईल लोकेशनचा तांत्रिक तपास केला. लोकेशनच्या आधारे ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल चांदोरे यांच्या नेतृत्वात सागर दुतोंडे, राधिका गाताडे यांच्या एका विशेष पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील श्रीधर नगर येथून एका दिवसात १७ जून रोजी मुलीची सुटका केली. आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अक्षय पंजाब चव्हाण, रा. श्रीधर नगर, जिल्हा बुलढाणा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलीला सुखरूप पोलिसांनी आईच्या ताब्यात दिले आहे.
 
 
विशेष म्हणजे, पोलिसांच्या या पथकाने एका दिवसात शोध लावून मुलीला सुखरूप अंजनगाव सुर्जी येथे परत आणले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल चांदोरे यांनी हे प्रकरण अतिशय समय सूचकतेने हाताळले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून समुपदेशनानंतर तिला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलिस करीत आहेत.