सोमवारपासून आर्द्रा नक्षत्राला सुरूवात
सेलू,
Farmers बेडूक वाहन घेऊन आलेले मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतकर्यांना असताना मात्र मृग नक्षत्रात तापलेला उन्हाळा पाहता सोमवार पासून सुरू होणार्या आर्द्रा नक्षत्रावर शेतकर्यांची भिस्त उरली आहे. ८ जून रोजी मृग नक्षत्राला सुरूवात झाली. रविवार २१ रोजी हे नक्षत्र संपणार असून सोमवार २२ रोजी आर्द्रा नक्षत्राला सुरूवात होणार आहे. आर्द्रा नक्षत्र गाढव वाहन घेऊन प्रवेश करणार आहे. मृग नक्षत्राचे १५ दिवस कोरडे गेल्याने शेतकर्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहे. आर्द्रा नक्षत्रात सुरूवातीला पाऊस आला तरी ८ दिवस पेरणीसाठी लागणार आहे. त्यामुळे उशिरा पेरण्या झाल्यास याचा परिणाम उत्पन्नावर होतो. पावसाळ्याचे दिवस लागले असताना पाऊस आला नसल्याने वातावरणातील उकाडा कायम आहे.
शेतकर्यांनी बी-बियाणे व खते खरेदी केली. पावसाअभावी कपाशी पेरणीस होत असलेला विलंब शेतकर्यांना आर्थिक अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना तर ठरणार नाही ना, असे बोलल्या जात आहे. यावर्षी अधिक मास आल्याने अधिक उत्पादन होत असल्याची भावना शेतकरी व्यत करताना दिसत आहे. पण पूर्ण नक्षत्रच कोरडे गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
गाढव साथ देणार काय?
बेडूक वाहन नक्षत्र असलेल्या मृग नक्षत्रात पावसाने दगा दिल्याने गाढव वाहन असलेले आर्द्रा नक्षत्र शेतकर्यांना साथ देणार काय, याकडे शेतकर्यांच्या नजरा लागल्या आहे. वातावरणातील उकाडा दूर करण्यास हे नक्षत्र सर्वांना दिलासा देईल काय, याकडेही लक्ष लागले आहे.
कपाशीसाठी होणार विलंब
खरीप हंगामात कपाशी हे पीक शेतकर्यांसाठी महत्त्वाचे आहे. पण, पावसाला विलंब पाहता कपाशीच्या पेरण्या विलंबाने झाल्यास शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागणार असल्याचे बोलल्या जात आहे. पावसाने अशीच हुलकावणी दिल्यास शेतकर्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शयता वर्तवली जात आहे.