श्रमशती व असंघटित क्षेत्रातील सर्वेक्षणाचा शुभारंभ

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
shramshati sarvekshan विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी राज्यात प्रथमच जिल्हानिहाय श्रमशती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते १५ रोजी करण्यात आला. यावेळी दोनही सर्वेक्षणाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार, जिल्हा सािं‘यकी कार्यालयाचे उपायुत मुरलीनाथ वाडेकर, सहाय्यक नियोजन अधिकारी राधाकृष्ण चव्हाण, मु‘याधिकारी विजय देशमुख आदी उपस्थित होते.
 
 
shram
 
श्रमशती सर्वेक्षणाद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगाराच्या स्थितीचा अचूक आढावा घेण्यात येतो. कौशल्य विकास कार्यक‘मांना दिशा देण्यासोबतच रोजगार निर्मितीच्या प्रभावी योजना राबविण्यासह जिल्ह्याचा आर्थिक व सामाजिक विकासाचा अंदाज तयार करण्यासाठी सर्वेक्षण उपयुत ठरते. त्याचबरोबर श्रम बल सहभाग दर, कामगार लोकसं‘या गुणोत्तर आणि बेरोजगारी दर मोजणीस सर्वेक्षणामुळे हातभार लागतो. यासोबतच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे सर्वेक्षण देखील करण्यात येणार असून असंघटित बिगर कृषी उद्योगांची माहिती संकलित करणारे हे एक महत्वाचे सर्वेक्षण आहे. अर्थव्यवस्थेतील असंघटित बिगर कृषी क्षेत्रातील लहान उत्पादक, व्यापारी आणि सेवा प्रदाता क्षेत्रातील वाहतूक, शिक्षण, आरोग्य आदी आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्टे मोजण्यासाठी सर्वेक्षण उपयुत आहे. या सर्वेक्षणामुळे असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे स्वरुप, आकार, कार्यपद्धती, संसाधने, उत्पादन आणि सेवांचे वितरण, खर्च आणि उत्पन्न यांची माहिती मिळते.
 
 
हे सर्वेक्षण मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे. श्रमशती सर्वेक्षणासाठी निवडलेल्या कुटुंबाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. संकलित केलेली माहिती पूर्णपणे गोपनिय राहणार आहे. श्रमशती व असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या सर्वेक्षणात संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले.