’ असे लिहून ‘जेईई’च्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या
अभ्यास होत नसल्याने व्यक्त केली होती खंत
नागपूर,
Wathoda: Suicide Case ‘आई..तू मला खूप परीश्रम करुन शिकवत आहेस. तुझे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, माझा अभ्यास होत नाही आहे. त्यामुळे मी तुझे स्वप्न पूर्ण करु शकत नाही. आई...प्लिज मला माफ कर.’ असे शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत एका ‘जेईई’च्या विद्यार्थिनीने घरात आईच्या साडीने गळफास लावून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवारी वाठोडा परिसरात उघडकीस आली. वैदेही सुनील गुलगे (१७, प्रधानमंत्री आवास योजना, वाठोडा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
माहितीनुसार, वैदेहीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिची आई वंदना यांनी मोठे काबडकष्ठ करुन दोन्ही मुलांचा सांभाळ केला. तिची आई टेलरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. वैदेहीचे अभ्यासात मन लागत नसल्याने तिची आई कधीकधी तिला अभ्यासासाठी रागावायची. शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून मी दिवसरात्र मेहनत करते. त्यामुळे मुलांनी शिक्षणात प्रगती करावी, असे तिला नेहमी वाटायचे. मात्र, मेहनत करूनही अपेक्षेप्रमाणे अभ्यास होत नसल्याने वैदेही मानसिक दडपणाखाली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने शुक्रवारी मध्यरात्री स्वयंपाकघरातील सिलिंग फॅनला आईची साडी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास दरम्यान पोलिसांना वैदेहीने लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. ‘आई माझ्यावर एवढा पैसा खर्च करत आहे, तरीही मी तिचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही’ असे लिहीत वैदेहीने आई आणि भावाची माफी मागितली आहे आणि याच कारणास्तव आपण हे आत्मघातकी पाऊल उचलत असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. वाठोडा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.