अमरावती-परतवाडा रोडवरील झाडतोडीचा मुद्दा हायकोर्टात

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
amravati-paratwada-road : अमरावती-परतवाडा रोडच्या चौपदरीकरणासाठी झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम मनाई केली होती. ही स्थगिती हटविण्यासाठी पीडब्ल्यूडीने न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. पीडब्ल्यूडीने झाडे तोडण्यास परवानगी मागितली आहे.
 
 

amravati-paratwada-road 
 
 
 
यावर न्यायालयाने पीडब्ल्यूडीला एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी २०२० मध्ये झाडे तोडण्यास अंतरिम मनाई केली होती. त्यामुळे पीडब्ल्यूडीने आता झाडे तोडण्यास परवानगीची मागणी करीत स्थगिती आदेश हटविण्याकरिता मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्यासमक्ष पुढील आठवड्यात सुनावणी होईल.
 
 
 
दरम्यान अमरावती-परतवाडा रोडवरील वर्दळ सतत वाढत आहे. त्यामुळे या रोडचे चौपदरीकरण करणे सरकारच्या विचाराधीन होते. त्यावर अंतिम निर्णय झाला होता. या ४७ किलोमीटर लांबीच्या रोडचे चौपदरीकरण केले जाणार आहे. हा ६०० कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. त्याकरिता मोठमोठी व विविध प्रजातींची शेकडो झाडे तोडली जाणार आहेत. त्याविरुद्ध वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. न्यायालयाने त्या बातम्यांची दखल घेऊन याविषयी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.