तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yoga-day :
गांधीभवनात योगदिवस साजरा
हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळ व मल्लखांब अॅकेडमीच्या विद्यमाने रविवार, 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिवस गांधीभवन येथे सकाळी 7 वाजता साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य मनोज येंडे प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान व्यायामशाळेचे सदस्य राजू देशपांडे, बॉक्सिंग प्रशिक्षक अनुपम मिश्रा, डॉ. गणेश सव्वालाखे, योगप्रचारक प्रा. अभिजित पवार, पंकज डोळसे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र टाके उपस्थित होते.
सर्वप्रथम दीपप्रज्वलन व हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन, नंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाचे सदस्य अँग्लो हिंदी हायस्कूलचे पर्यवेक्षक संजय सातारकर यांनी थोडक्यात प्रास्ताविक सादर केले. नंतर योगमंत्राचे पठण व योगासने करून सूर्यनमस्कार घेण्यात आले.
या खेळाडूंनी जिल्हास्तर योग स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय स्थान मिळवले आहे, अशा खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. गणेश सव्वालाखे यांनी योग शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे याची माहिती दिली.
त्यानंतर प्राचार्य मनोज येंडे यांनी पुरातन काळापासून योगाला किती महत्व आहे, याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. श्रेया चुटे, परी डोळसे, रश्मी कुमरे, योग प्रशिक्षक वंशिक वडे, योग खेळाडू मुक्ता मेश्राम, श्रेया चुटे, नक्षत्रा रश्मी, कुमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळ व मल्लखांब अॅकेडमीतर्फे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संजय सातारकर यांनी विशेष पुढाकार घेतला. आभारप्रदर्शन प्रा. अभिजित पवार यांनी केले.
----------------
आयुर्वेद महाविद्यालयात योगदिन उत्साहात साजरा
यवतमाळ,
येथील आयुर्वेद महाविद्यालयात समाजाला योगासनाच्या अभ्यासाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या हेतूने 14 ते 20 जून दरम्यान नि:शुल्क योग शिबिर आयोजित केले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डॉ. श्याम गाढवे यांचे अतिथी व्याख्यान आणि योगदिंडीचेही आयोजन करण्यात आले.
रविवारी पोलिस प्रशासन तसेच इतर योगसंस्था व आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस कवायत मैदानात सकाळी 6 वाजता सामूहिक योगदिवस साजरा करण्यात आला. त्यात हजारोंच्या संख्येत एकत्र येऊन योगाभ्यास करण्यात आला.
या कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पोलिस अधीक्षक कुमार चिंता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचालन शंतनू शेटे यांनी केले. सर्वांना नियमित योग करण्यासाठी राजू पडगिलवार यांच्यामार्फत शपथ देण्यात आली.
महाविद्यालयीन कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक डॉ. मनोज येरावार, प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. अशा प्रकारे विविध स्पर्धा, शिबिराचे आयोजन करून आयुर्वेद महाविद्यालयात योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
----