जिल्हा सहकारी बँकेमार्फत शासकीय व्यवहार सुरू करा : माजी मंत्री राजेंद्र शिंगणे

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
बुलढाणा, 
rajendra-shingne : जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर शासकीय व्यवहार बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुरू करण्याची मागणी माजी मंत्री तथा विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
 
h
 
 
 
केंद्र शासनाच्या पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत नागपूर, वर्धा आणि बुलढाणा या तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांना आर्थिक मदत मिळाली असून त्यांना स्वतंत्र परवाना व व्यवहाराची परवानगी देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नागपूर व वर्धा बँकांच्या तुलनेत अधिक प्रगती साधली असून राज्य शासनाने दिलेल्या हमीच्या आधारे बँकेने नफाही कमावला आहे.तसेच ३१ मार्च २०२६ अखेर बँकेचे सीआरएआर प्रमाणे १०.४४ टक्के राखले आहे. जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या सुमारे ३०.३१ कोटी रुपयांच्या ठेवींची परतफेडही बँकेने केली आहे. बँकेच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, शाळा-महाविद्यालये यांचे वेतन व्यवहार तसेच विविध शासकीय योजनांचे व्यवहार जि.म.स. बँकेमार्फत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेत नागपूर व वर्धा बँकांप्रमाणेच बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश करावा, अशी मागणी डॉ. शिंगणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.यामुळे बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिक सक्षम व आर्थिकदृष्ट्या भक्कम होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.