आ. संजय खोडके तालिका सभापती

विधान परिषदेत सांभाळले कामकाज

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
अमरावती, 
sanjay-khodke : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विधान परिषदेतील कामकाजा दरम्यान पीठासीन सभापती राम शिंदे यांच्या अनुपस्थितीत तालिका सभापती म्हणून आ. संजय खोडके यांनी सभागृहाचे कामकाज सांभाळले.
 
 
 
jh
 
 
 
सत्ताधारी पक्षाच्या वतीने आणलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम २६० च्या प्रस्तावावर चर्चा सुरु असताना पीठासीन तालिका सभापती संजय खोडके यांनी आपल्या संसदीय कामकाजाचा परिचय देऊन तब्बल दोन तास विधान परिषदेतील कामकाज चालविले. यावेळी सभागृहातील सदस्यांनी शेतकरी, दुष्काळजन्य परिस्थिती, कर्जमाफी, विविध कृषी योजना, जलसंधारण अशा विविध मुद्दांवर चर्चा केली. त्यांनी नियोजित वेळेत प्रत्येक सदस्यांना बोलण्याची संधी दिली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. शिस्त, संयम व विवेक बुद्धीचा प्रत्यय त्यांनी घडविला. तालिका सभापती म्हणून काम सांभाळल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.