डॉ. सिंग याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
* न्यायालयीन कोठडी कायम
* किडनी विक्री प्रकरण

चंद्रपूर, 
Kidney sale case रोशन कुळे यांच्या किडनी विक्रीचे प्रकरण देशभर गाजले. त्या रॅकेटच्या आठ आरोपींना अटक झाली. मात्र, महत्त्वाची भूमिका वठवणारे दिल्लीचे डॉ. रवींद्र पाल सिंग आणि तामिळनाडूचे डॉ. गोविंदास्वामी हे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर मंगळवारी डॉ. रवींद्र पाल सिंग याने ब्रह्मपुरी न्यायालयात आत्मसमर्पण केले. न्यायाधीशांनी त्यास 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गुरूवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनवणी झाली. त्यात पोलिसांनी बाजू मांडत डॉ. सिंगच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, सुनावणी पुढे ढकल्यात आली आहे.
 
 
kidani
 
डॉ. सिंग यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीत पोलिसांनी त्यांची बाजू जोरकसपणे मांडली. परंतु, डॉ. सिंग यांच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. डिसेंबर 2025 मध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी रोशन कुळे याने सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडल्याने स्वतःची किडनी विकली होती. या किडनी विक्रीचे एक पध्दतशीर रॅकेट होते, हे नंतर तपासात उघड झाले आणि हे प्रकरण देशभर गाजले. या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शनही उघडकीस आले. दरम्यान, कोल्हापूर येथून दलाल आरोपी रामकृष्ण सुंचू आणि चंडीगड येथून आधी स्वत:ची किडनी विकलेला आणि नंतर याच धंद्यात दलाल झालेला आरोपी हिमांशू भारद्वाज या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या माध्यमातून दिल्लीचे डॉ. रवींद्र पाल सिंग आणि त्रिचीचेडॉ. गोविंदास्वामी यांचा सुगावा लागला. या दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा भक्कम पुरावा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
 
डॉ. गोविंदास्वामी अद्याप फरार
डॉ. सिंग याने आत्मसमर्पण केले असले, तरी या प्रकरणातील आणखी एक महत्वाचा संशयित आरोपी तामिळनाडू येथील डॉ. राजरत्नम गोविंदास्वामी हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.