जिल्ह्यात सरासरी ७४ मि.मी. पावसाची नोंद मोताळा तालुका आघाडीवर

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
पावसाच्या विश्रांतीने शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त
 
बुलढाणा, 
Highest rainfall in Motala Taluka जिल्ह्यात शनिवार (२७ जून) रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरी ७४.० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ती जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ९.७१ टक्के आहे. शुक्रवारी २६ जूनच्या अहवालानंतर गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६.४ मि.मी. पावसाची भर पडली आहे. पावसाच्या विश्रांतीने शेतकरी खते बि-बियाणे खरेदी केंद्रावर गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी परेणीच्या कामात शेतकरी व्यस्त झाले आहेत.
 
 
rain ds
 
मोताळा तालुयात सर्वाधिक ९४.४ मि.मी. (१३.२५ टक्के) पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ जळगाव जामोद ९५.२ मि.मी. (१३.४६ टक्के), मेहकर ९४.५ मि.मी. (११.२७ टक्के), बुलढाणा ८६.४ मि.मी. (१०.०४ टक्के), नांदुरा ७५.४ मि.मी. (१०.१० टक्के) आणि शेगाव ६९.९ मि.मी. (१०.२४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. महसूल विभागाच्या वर्तुळनिहाय नोंदीनुसार जिल्ह्यातील काही भागांत गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाला असून, त्यामुळे अनेक तालुयांतील पर्जन्यमानात वाढ झाली आहे. जिल्ह्याची एकूण सरासरी पर्जन्यमान नोंद ७३.६ मि.मी. असून ती सरासरीच्या ५२.८ टक्के इतकी आहे.