चंद्रपूर बचाव समितीतर्फे ‘सीड बॉल’ कार्यशाळा

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
जुलै महिन्यात ठिकठिकाणी उधळल्या जातील बिया

चंद्रपूर, 
‘seed ball’ karyashala चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे शनिवार, 27 जून रोजी डॉ. मुंधडा यांच्या मोरवा येथील फार्महाऊसवर ‘सीड बॉल’ कार्यशाळा पार पडली. मोठ्या प्रमाणात समाजातून गोळा केलेल्या फळ-झाडांच्या बियांचे लहान लहान गोळे तयार करण्यात आले. येत्या जुलै महिन्यात बर्‍यापैकी पाऊस येताच हे ‘सीड बॉल’ यथायोग्य ठिकाणी उधळले जातील, जेणेकरून झाडे लागतील.
 
 
seed
 
या कार्यशाळेत ‘सीड बॉल’ तयार करण्याची योग्य पद्धत, बियांची निवड, मातीचे योग्य प्रमाण तसेच पावसाळ्यात विविध भागांमध्ये ‘सीड बॉल’चे प्रभावी वितरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, कोषाध्यक्ष विलास माथनकर, मीडिया प्रभारी संजय रामगिरवार, महेंद्र राळे, सुधाकर कावडे तसेच संस्थेच्या सदस्य तसेच प्रकल्प संचालक शरयू कुबेर उपस्थित होत्या. याप्रसंगी आगामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर ‘सीड बॉल’द्वारे अधिकाधिक वृक्षारोपणाला चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी होऊन निसर्ग संवर्धनात आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.