श्रीकृष्ण नृत्यालयाच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय ‘युवा कलोत्सवा’त प्रस्तुती

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
'Yuva Kalotsav' नागपूर येथील सुप्रसिद्ध श्रीकृष्ण नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी मध्यप्रदेशातील सागर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘युवा कलोत्सव २०२६-२७’ मध्ये मोहिनीयट्टम नृत्याची अप्रतिम प्रस्तुती सादर करून रसिकांची मने जिंकली.
 
 
kala
 
नुकतेच सागर (म.प्र.) येथील महाकवी पद्माकर सभागृहात संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली आणि जिल्हा पुरातत्त्व, पर्यटन व संस्कृती परिषद, सागर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नागपुरातील डॉ. हनी उन्नीकृष्णन, यामिनी सुंदरम आणि अनखा अनिल यांनी ‘मोहिनीयट्टम’ या केरळच्या पारंपरिक शास्त्रीय नृत्यशैलीची अत्यंत देखणी प्रस्तुती सादर केली. त्यांच्या लयबद्ध हालचाली, भावपूर्ण अभिनय आणि सादरीकरणाने उपस्थित मान्यवर, कलारसिक व प्रेक्षकांची दाद मिळवली. श्रीकृष्ण नृत्यालयाच्या संचालिका प्रमिला उन्नीकृष्णन यांनी विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.