पशुपालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान
महागाव,
Leopard attack काळीदौलत वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत लेवा शिवारातील जंगल भागात बिबट्याने गायींच्या कळपावर हल्ला चढवला. या हल्ल्यात बिबट्याने दोन गायींना ठार केले. यामुळे परिसरात कमालीची दहशत पसरली आहे. यामुळे संबंधित गरीब पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्या शेतकèयाने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. महागाव तालुक्यातील बारभाई (तांडा) येथील जनावरांचा कळप नेहमीप्रमाणे रविवार, 28 जून रोजी लेवा शिवारातील जंगल भागात चरण्यासाठी गेला होता. दिवसभर चरल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हा जनावरांचा कळप घराकडे परतत होता.
त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कळपावर हल्ला चढवला. बिबट्याचा वेग आणि हिंस्त्रता इतकी भयानक होती की, त्याने कळपातील दोन गायींचा जागीच फडशा पाडला. अचानक झालेल्या या बिबट हल्ल्यामुळे इतर जनावरांचीही पळापळ झाली. बिबट्याच्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गायी बारभाई (तांडा) येथील सुभाष मंगू पवार आणि बाळू धनू जाधव यांच्या मालकीच्या होत्या. या दोन्ही कुटुंबांचा उदरनिर्वाह बèयाच अंशी या दुभत्या जनावरांवर अवलंबून होता. बिबट्याच्या हल्ल्यात गायी गमावल्यामुळे या दोन्ही गरीब पशुपालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तत्काळ घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त पशुपालकांना त्वरित आर्थिक मदत द्यावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकèयांकडून होत आहे.