प्रताप अडसड व नितीन गुडधे भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
अमरावतीत संघटनात्मकदृष्टीने फेरबदल
 
अमरावती, 
Organizational reshuffle in Amravati भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी भाजपा अमरावती ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड तर अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदी नितीन गुडधे यांची नियुक्ती केली आहे. अध्यक्षपदांमध्ये अचानक झालेल्या बदलामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या नव्या नियुक्त्या संघटनात्मकदृष्टीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 

pratap 
भाजपाने अमरावती जिल्ह्याला तीन भागात विभागून तीन अध्यक्षांची नियुक्ती मे २०२५ मध्ये केली होती. त्यात अमरावती ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख, अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदी डाॅ. नितीन धांडे, अमरावती ग्रामीण (मेळघाट) जिल्हाध्यक्षपदी प्रभुदास भिलावेकर यांचा समावेश होता. जवळपास एक वर्षानंतर रविराज देशमुख यांच्याजागेवर आ. प्रताप अडसड तर डाॅ. धांडे यांच्याजागी नितीन गुडधे यांची नियुक्ती नव्याने करण्यात आली आहे. भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ ३ वर्षाचा असतो. उपरोक्त दोघांच्या जागेवर एक वर्षातच नव्या नियुक्त्या झाल्याने भाजपा संघटनेत काम करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. हा बदल नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी संघटनात्मकदृष्टीने हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या दोन्ही अध्यक्षांचे जोरदार स्वागत होत आहे.