नामिबिया दौर्‍यासाठी विदर्भाचा कर्णधार यश कदम

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
Vidarbha Cricket Association विदर्भ क्रिकेट असोसिएशनचा १६ सदस्यांचा वरिष्ठ पुरुष संघ ३० जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत नामिबियाचा दौरा करणार असून यासाठी विदर्भाचा कर्णधार यश कदम राहणार आहे. विंडहोक (नामिबिया) येथे त्यांच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध पाच एकदिवसीय सामने खेळेल. विदर्भ हा ‘विजय हजारे करंडक’ स्पर्धेचा विद्यमान विजेता संघ आहे. या दौर्‍यामुळे विदर्भातील खेळाडूंना ’प्री-सीझन’ (हंगाम-पूर्व) काळात मौल्यवान आंतरराष्ट्रीय अनुभव आणि विकासाच्या संधी मिळतील.
 
 
vcz sd
 
व्हीसीएच्या वरिष्ठ निवड समितीने निवडलेल्या संघाचे नेतृत्व यश कदम करेल, तर यश राठोडची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या दौर्‍यावर जाणार्‍या संघात अनुभवी खेळाडूंसोबतच, नुकत्याच पार पडलेल्या ’विदर्भ प्रीमियर लीग’मधील कामगिरीच्या आधारे निवडलेल्या उदयोन्मुख खेळाडूंचाही समावेश आहे. ‘क्रिकेट नामिबिया’च्या वरिष्ठ पुरुष संघाविरुद्ध पाच (५) एकदिवसीय सामने: २, ४, ६, ८ आणि १० जुलै २०२६ रोजी खेळण्याचे प्रस्तावित (अंदाजित वेळापत्रक) १६ सदस्यांचा संघ खालीलप्रमाणे आहे:
 
 
यश कदम (कर्णधार), यश राठोड (उपकर्णधार), अध्ययन डागा, आदित्य आहुजा, रोहित बिनकर (यष्टिरक्षक), वेदांत जाजू (यष्टिरक्षक), पार्थ मंदार महाले, मोहम्मद फैज, आदित्य ठाकरे, नचिकेत भुते, सौरभ दुबे, सनमेश देशमुख, जगजोत सासन, वरुण बिष्ट व गौरव फारदे.
प्रशिक्षक: प्रीतम गंधे, फिजिओ: डॉ. रॉनी चॅटर्जी. व्यवस्थापक: परेश दाऊतखानी. निरीक्षक: हिमांशू जोशी.