निरामय जीवनाचा मूलमंत्र देणारे डॉक्टर

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
श्याम पांडे
दारव्हा, 
Doctor's Day आपल्यासाठी सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे आरोग्य. आपल्या स्वतःच्या आरोग्यासोबतच जास्त मौल्यवान आपल्या घरच्या व जवळच्या व्यक्तीचं आरोग्य, हे फार महत्वाचे आहे. यापैकी कोणाच्याही आरोग्याच्या प्रश्न निर्माण होतो त्यावेळी, आपल्या अपत्यांना बर नसलं की कुटुंबप्रमुख कुठलीही कामे टाकून डॉक्टरांकडे धाव घेतात.
 
 
doc
 
जर आपल्या प्रकृतीत काही कुरबुरी सुरू झाल्या की आपली आजकाल लगेचच धाव डॉक्टरकडे असते. आपली तब्येत चांगली हवी असते, त्वरित आराम पाहिजे असतो. एकदा डॉक्टरांची भेट घेतली की, अर्था आजार बरा झाला असे वाटायला लागते.
रुग्णाच्या चेहèयावरील आनंद हा त्या डॉक्टरांचे यश आहे. रुग्णाच्या निरामय जीवनामुळे डॉक्टरांनादेखील समाधान मिळते. आपल्या तब्येतीची काही कुरबुर ही डॉक्टरांच्या माध्यामातून दूर होते. योग्य औषधोपचार, योग्य आहार, शरीराची हालचाल, डॉक्टरांनी दिलेला सल्ला यामुळे शरीर तंदुरुस्त ठेवता येते.
 
 
डॉक्टरांचे कार्य याकरिता कोणतेही वेळापत्रक नसते. कारण कधीही कोणत्याही वेळेला रुग्ण येऊ शकतो. आपल्याकडे आलेल्या रुग्णाला न्याय देणे हे प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्य आहे आणि ते त्यानुसार करीत असतात. कुठल्याही अवयवाला दुखापत झाली किंवा त्यात बिघाड झाला की आठवतात ते म्हणजे डॉक्टर. म्हणतात, ईश्वरानंतर जो कोणी असेल तर ते म्हणजेे डॉक्टर हेच खरे आहे.