गोंदिया,
police-transfers : गोंदिया जिल्हा पोलिस दलात मोठा प्रशासकीय खांदेपालट करण्यात आला असून पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक अशा विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम २२(न) पोटकलम (२) मधील तरतुदीनुसार जिल्हा आस्थापना मंडळाने हा निर्णय घेतला असून जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी त्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

आदेशानुसार गोंदिया ग्रामीणचे पोलिस निरीक्षक रेवचंद खुशाल सिंगनजुडे यांची प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. रामनगरचे पोलिस निरीक्षक प्रवीण देवाजी बोरकुटे यांची गोंदिया शहर, रावणवाडीचे पोलिस निरीक्षक वैभव श्रीरंग पवार यांची गोंदिया ग्रामीण तर आमगावचे पोलिस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांची रामनगर येथे बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक रामदास विठ्ठल शेवते यांची रावणवाडी येथे, वाचक शाखेचे पोलिस निरीक्षक रवि श्यामराव नागोसे यांची सालेकसा पोलिस ठाण्यात, तसेच नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक निळकंठ घनश्यामजी कुकडे यांची आमगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यातच दावणीवाडाच्या महिला पोलिस निरीक्षक वैशाली माणिकराव ढाले यांची गोरेगाव, डुग्गीपारचे पोलिस निरीक्षक गणेश कृष्णा वनारे यांची देवरी, अर्जुनी/मोरगावचे पोलिस निरीक्षक कमलेश विलास सोनटक्के यांची डुग्गीपार, तर केशोरीचे ठाणेदार मंगेश भिमराव काळे यांची अर्जुनी/मोरगाव येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय गोरेगाव येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत दयाराम भुते यांची दावनीवाडा, मुरकुटडोह बेस कॅम्पचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन बाबासो ढेकणे यांची केशोरी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज शंकरराव राजुरकर यांची गंगाझरी, तर गंगाझरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर शिवनाथ वर्मा यांची बी.डी.डी.एस. पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिल अरुण पाटील यांची वाचक शाखेत, तसेच नियंत्रण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक निलकमल झाडुलाल लिल्हारे यांची दावणीवाडा येथे अंतर्गत प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.