New Court Buildings महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनुसार उमरखेड येथे नवीन न्यायालयीन इमारतीसाठी 57 कोटी 25 लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. ही इमारत तळमजला अधिक दोन मजले अशी असून एकूण 11 कोर्ट हॉल होणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे उमरखेड व परिसरातील नागरिकांना न्यायव्यवस्थेच्या सुविधा अधिक सुलभ व सक्षमपणे उपलब्ध होणार असून हा निर्णय न्यायप्रक्रिया अधिक गतिमान, सोयीस्कर व प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
अतिरिक्त नवीन न्यायालयाची इमारत बांधण्याबाबतचा प्रस्ताव उच्च न्यायालयाने शासनास सादर केला आहे. त्यानुसार या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. उमरखेड येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्यासाठी 57.25 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत उच्चाधिकार सचिव समितीच्या 21 मे रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. उमरखेड येथे ही न्यायालयीन इमारत पूर्णत्वास आल्यानंतर त्याचा उपयोग हा तालुक्यातील 7 किमी अंतरावरून येणाèया नागरिकांना दिलासा देणारा ठरणार आहे.