स्टेट बँक चौक व शारदा चौक येथे वाहतूक सिग्नलचे लोकार्पण
यवतमाळ,
transport system in Yavatmal शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचे प्रमाण कमी करणे तसेच नागरिकांना सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतुकीचा अनुभव मिळावा या उद्देशाने शहरातील महत्त्वाचे स्टेट बँक चौक आणि शारदा चौक येथे नव्याने बसविण्यात आलेल्या आधुनिक वाहतूक सिग्नलचे लोकार्पण नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी नगर परिषदेच्या वतीने शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. या सिग्नलमुळे वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावी होणार असून चौकांमध्ये होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल, तसेच वाहनचालक आणि पादचाèयांच्या सुरक्षिततेतही मोठी भर पडणार आहे. या कार्यक्रमास नगर परिषदेतील सर्व नगरसेवक, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी, परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. शहराच्या विकासासोबतच सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुकर वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नगर परिषद सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.