पाठ फिरली आणि पोळा फुटला..!
यवतमाळ,
UBT Shiv Sena ‘निष्ठेची वज्रमूठ’ असा गाजावाजा करत ‘ऑपरेशन टायगर’नंतर उद्धवसाहेब आणि बाळराजे यांनी सर्वात आधी यवतमाळला कार्यकर्ता मेळावा घेतला. शनिवारी मेळावा झाला आणि दुसèयाच दिवशी या मेळाव्यात उपस्थित असलेल्या त्यांच्या अनेक पदाधिकाèयांनी राजीनामे दिले. ‘वज्रमूठ’ फुसकी निघाली. उबाठा शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शनिवारी यवतमाळात जाहीर सभा घेतली. ही सभा घेऊन ते जिल्ह्याबाहेर पडतात न पडतात तोच त्यांच्या गटाच्या अनेक पदाधिकाèयांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. हा पोळा फुटण्यामागचे प्रमुख कारण मुंबईकर वरिष्ठांचे दुर्लक्ष हे आहे.
उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळच्या सभेनंतर दुसèयाच दिवशी यवतमाळ तालुक्यात मोठी राजकीय घडामोड झाली. अनेक वरिष्ठ पदाधिकारी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे देऊन मोकळे झाले. वरिष्ठ पदाधिकाèयांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आणि संघटनेतील कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
आपल्या राजीनामापत्रात संबंधित पदाधिकाèयांनी आपण अनेक वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले असून सोपविण्यात आलेल्या जबाबदाèया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे व वैयक्तिक अडचणींमुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.
राजीनामा देणाèयांमध्ये उपजिल्हाप्रमुख राजेंद्र धोत्रे, तालुकाप्रमुख गजानन पाटील, तालुका संघटक गणेश आगरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख अंजली गिरी, उपशहर प्रमुख प्रतिभा हरणखेडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख गिरीराज कळंबे, युवासेना तालुकाप्रमुख अक्षय वाकरे, तालुका युवाप्रमुख स्वप्नील खोब्रागडे, युवासेना तालुका संघटक मंगेश चोपडे, युवासेना विधानसभा संघटक ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह युवासेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, चेतन जगताप, नितीन महल्ले, गजानन पोटे, साजिद अब्दुल रहमान यांचा समावेश आहे. या सामूहिक राजीनाम्यांमुळे उबाठा शिवसेनेच्या यवतमाळ तालुक्यामधील संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पक्षप्रमुखांच्या सभेनंतर लगेचच ही घडामोड घडल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही संजयांनी केला गेम
उद्धव ठाकरे यांनी यवतमाळच्या सभेत खासदार संजय देशमुख आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर टीका केली होती. दुसèया दिवशी या दोन्ही संजयांनी मिळून त्यांचा गेम केला. राजीनामा देणारे सर्व पदाधिकारी दुसèया दिवशी संजय राठोड यांच्या घरी आढळून आले होते. याच ठिकाणी खा. संजय देशमुखसुद्धा उपस्थित होते. लवकरच हे सर्व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
वरिष्ठांचे दुर्लक्ष कारणीभूत
युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाèयांच्या याद्या घेऊन नियुक्तीसाठी अनेकदा मुंबई वाèया केल्या. मात्र त्यांच्या मागणीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केले. एकही काम होत नसल्याने, तसेच पक्षाचे वरिष्ठ नेतेसुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे अमोल धोपेकर यांनी सांगितले.