राजना शिवारात युवकाची निर्घृण हत्या

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
आरोपींना दोन तासांत अटक
 
चांदूर रेल्वे,
Murder in Rajana Farmlands चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना शेतशिवारात ३० वर्षीय युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना गुरूवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्याच्या केवळ दोन तासांत घटनेतील दोन्ही आरोपींना चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केली.
 
 
murdddksl
 
Murder in Rajana Farmlands  राजना येथील आदिशक्ती ढाब्याच्या समोर मोहम्मद आसिफ यांच्या शेतामध्ये राजना येथीलच ३० वर्षीय नितीन मोरेश्वर भगत याचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले असल्याची माहिती राजना गावचे पोलिस पाटील यांच्याकडून ४ जूनला सकाळी ७ वाजता चांदूर रेल्वे पोलिसांना मिळाली. माहितीवरून ठाणेदार अजय आकरे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मृतकाची ओळख पटवली. आजूबाजूला राहणारे लोक व गुप्त बातमीदार यांच्याकडून तात्काळ माहिती काढून राजना गावातीलच २६ वर्षीय प्रफुल्ल सुभाष राऊत व ३२ वर्षीय रोहन ईश्वर मेश्राम या दोघांना अटक केली. ही कारवाई पीएसआय नंदलाल लिंगोट, पीएसआय नितेश आझडे, पीएसआय रोहित कुदळे, कर्मचारी शिवाजी घुगे, वसंत, नितीन, योगेश, राहूल, संदीप, शुभम, स्वप्निल, नीलेश यांनी केली.