‘मेरा युवा भारत’ द्वारा जागतिक पर्यावरण दिवस

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
यवतमाळ, 
World Environment Day मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार यवतमाळद्वारा शुक्रवार, 5 जूनला राणाप्रताप नगर शिवमंदिर परिसरामध्ये जागतिक पर्यावरण दिवसाचे आयोजन करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्याकरीता राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल चौहान, नगरसेवक बाळासाहेब काळे व कीर्ती राऊत, तसेच मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सूरज शिंदे, अनिल ढेंगे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
paryavdjfdksl
 
World Environment Day  तसेच साई इंग्लिश लर्नर अकॅडमी येथे अमित ढोणे, प्राची ढोणे आणि अकॅडमीचे युवक, तुळजाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे आकाश घुरट आणि इतर नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनीसुद्धा वृक्षारोपण केले. निसर्गाचा समतोल राखता यावा व पर्यावरणाचा èहास होण्यापासून संरक्षण व्हावे याकरिता वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. वाढते तापमान, आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल पाहता पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण हाच एक पर्याय आहे. याच उद्देशाने किमान एका व्यक्तीद्वारे किमान एक झाड लावून त्याची जोपासना करुन निसर्गाचा समतोल राखता यावा या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले.