स्वदेशीचा अवलंब, भारत होईल समृद्ध

    दिनांक :06-Jun-2026
Total Views |
बी. सी. भरतिया यांचे आवाहन
नांदगाव पेठ एमआयडीसी असो.ला भेट
 
अमरावती, 
देशाची अर्थव्यवस्था सशक्त करण्यामध्ये व्यापारी, उद्योजक आणि जागरूक ग्राहक यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय अर्थव्यवस्था बळकट करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सीए B. C. Bhartia बी.सी. भरतिया यांनी केले. नांदगाव पेठ एमआयडीसी असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सदस्यांना ते संबोधित करत होते. त्यांनी सांगितले की, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या व्यापाराला नवी उंची प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सतर्फे येत्या १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान भारत मंडपम, प्रगती मैदान दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य व्यापार महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव व्यापारी, उद्योजक, एमएसएमई, स्टार्टअप्स आणि सेवा प्रदात्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या व्यासपीठाद्वारे स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल आणि व्यापार विस्तारासाठी नवीन संधी निर्माण होतील.
 
 
bharatia
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी कॅट विदर्भ प्रांताचे अध्यक्ष विनोद कलंत्री यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांची आणि उपलब्धींची माहिती दिली. व्यापारी व उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कॅट नेहमीच सक्रिय असते, असे त्यांनी नमूद केले. कॅटचे राष्ट्रीय महामंत्री व चांदणी चौक दिल्ली येथील खासदार प्रवीण खंडेलवाल हे संसदेत व्यापार्‍यांचा प्रभावी आवाज म्हणून ओळखले जातात. जीएसटी सुधारणा आणि परवाना प्रणाली सुलभ करण्यामध्येही कॅटची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
B. C. Bhartia  कार्यक्रमात नांदगाव पेठ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष अफाक सुभेदार आणि उपाध्यक्ष जगदीश वाधवानी यांनी बी. सी. भरतिया यांचे स्वागत केले. यावेळी विशेष उपस्थित असलेल्या महा स्ट्राइड टीमचे अमरावती विभागीय व्यवस्थापक ऋषभ माहेश्वरी तसेच पर्यटन विभागाचे मृत्युंजय मिश्रा यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांची समायोजित भाषण झाले. दोन्ही अधिकार्‍यांनी महाराष्ट्र शासनामार्फत औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत उद्योग आणि व्यापार क्षेत्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कॅटचे राष्ट्रीय समन्वयक शाम शर्मा, जिल्हा सचिव गोपाल पांडे, कॅट एकवीरा महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. कुंजन वेद, सचिव विधी नावंदर, कॅट विदर्भच्या जया नगराळे तसेच एमआयडीसी असोसिएशनचे तुषार अग्रवाल, निलेश काकिर्डे, मनीष उधवाणी, गोपाल गुप्ता, साहब हुसेन सूभेदार, शैलेश अग्रवाल, जगदीश वाधवानी, अशोक मेंठाणी, दीपक पाटील, अमित त्रिवेदी, समीर खान आणि वसीम सिद्दीकी यांच्यासह अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते.