तीन बैलांसह बोलेरो जप्त
वणी,
Illegal smuggling of cattle शहराजवळील वाघदरा फाट्यावर शनिवारी रात्री गोवंश जनावरांची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाèया वाहनावर वणी पोलिसांनी धडक कारवाई करून तीन बैलांसह वाहन जप्त केले. या प्रकरणी तीन आरोपींवरगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. बजरंग दल कार्यकर्ते विशाल दुधबळे, रितेश पचारे व दिनेश सालवटकर यांना वणीकडे येत असताना एक संशयास्पद पिकअप जाताना दिसले. वाहनात गोवंश असल्याचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ वणी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहनाची तपासणी केली.
यावेळी एमएच32 क्यू2624 या वाहनात तीन बैल अत्यंत क्रूर पद्धतीने वाहतूक करत असल्याचे आढळून आले. जनावरांना आखूड दोरीने बांधून वाहनात कोंबण्यात आले होते. त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. वाहनचालक दुर्गाप्रसाद चरणदास लेंगुळे (शिरपूर) आणि सोबतचे मोहन रामचंद्र आसोले व लोकेश सुरेश पडोले (दोघेही रा. डोर्ली) यांच्याजवळ जनावर वाहतूक संदर्भात कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. या कारवाईत सुमारे 90 हजार रुपये किंमतीचे 3 बैल व 2 लाख रुपये किंमतीची बोलेरो पिकअप असा एकूण 2 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जनावरे उज्ज्वल गोरक्षण ट्रस्टच्या सुपूर्द करण्यात आली.