अमरावती,
chandrashekhar-bawankule : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे हे इतिहासातले सर्व विक्रम मोडून विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
सदर निवडणुकीचा प्रमुख पदाधिकार्यांकडून आढावा घेण्यासाठी चंद्रशेखर बानकुळे सोमवारी अमरावतीत आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले, विप्लव बाजोरिया यांचा अर्ज आम्ही बाद केलेला नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. कोणीही लढले असते तरी देखील प्रवीण पोटे प्रचंड मतांनी निवडून आले असते. पोटे सर्व समावेशक उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले.
//नवनीत यांचा विचार योग्यवेळी
नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्या आहे. त्या कधीही भाजपा सोडून जाणार नाही. त्या हिंदूत्ववादी, जय श्रीराम, जय हनुमान म्हणत काम करणार्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्याबाबत कोणीही संभ्रम निर्माण करू नये. त्या भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या आहे. त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहतील. एक निवडणूक हरली म्हणजे सर्व संपले असे नाही. नवनीत यांना आजही आम्ही खासदार मानतो, त्या खासदारच्या कमी नाही. त्या पुन्हा निवडून येतील. नवनीत यांचा योग्यवेळी पक्षात विचार होईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.