वाढत्या अवैध धंद्यांमुळे ढाणकीतील कायदा व सुव्यवस्था प्रश्न ऐरणीवर

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
ढाणकी, 
Rising illegal activities in Dhanki कायद्याचे रक्षक म्हणवणाèयांच्या नाकावर टिच्चून म्हणा किंवा त्यांच्या मूक संमतीने म्हणा, ढाणकी शहरात अवैध धंदे, चक्री, मटका, क्लब, जुगार, अवैध रेतीतस्करी, अवैध गुटखा तस्करी, अवैध गांजा, अवैध शिंदी विक्री खुलेआम सुरू आहे. शहरातील जुने बसस्टॉप वर्दळीच्या ठिकाणी, एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये अवैध धंद्याचे बस्तान मांडल्याचे चित्र सध्या ढाणकी शहरात दिसत आहे. एकीकडे बिटरगाव पोलिस ठाण्यात 12 ते 15 वर्षांपासून काही पोलिस ठाण मांडून बसले आहेत. सर्वांशीच असलेल्या हितसंबंधांमुळे शहरातील अवैध धंद्यामध्ये विविध पक्षांच्या पदाधिकाèयांची भागीदारी, असे पदाधिकारी किंवा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाèयांचा या पोलिसांवरील वरदहस्त, यामुळे ढाणकी शहरात अवैध धंदे बिनदिक्कतपणे चालत असल्याचे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
 
 
avaidh
 
ढाणकी शहरातील वाढते अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे हे लोक ढाणकीसाठी आणि भावी पिढीसाठी, अत्यंत धोकादायक आहेत. अशांची बिटरगाव पोलिस ठाण्यातून बदली व्हावी याकरिता काही नागरिकांचा प्रशासकीय स्तरावर लढा सुरूच आहे. परंतु हे पोलिसवाले मोठ्या प्रमाणात राजकारण करून, काही राजकीय लोकांना भूलथापा देऊन स्वतःसाठी वरिष्ठांकडे पाठवत असल्याचीही चर्चा आहे. या पोलिसांच्या समर्थनात शहरातील जे राजकारणी असतील, त्यांची घरे अवैध धंद्यातून मिळालेल्या कमिशनवर चालत असतील, म्हणून कदाचित ते गेलेही असतील. परंतु सामान्य ढाणकीकर हा अवैध धंदे व अशा पोलिसांच्या विरोधातच आहे. लवकरच सामान्य नागरिकांना न्याय मिळेल या प्रतीक्षेत असल्याचे सामान्य ढाणकीकर बोलून दाखवत आहेत. पोलिस अधीक्षकांनी यात गांभीर्याने लक्ष घालून येथील सामान्य नागरिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा ढाणकीकर व्यक्त करत आहेत.