महायुतीच्या विजयासाठी शिवसेनेचे तीनही आमदार मैदानात

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
हदगाव, 
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या vidhan parishad nivadanuk विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचार यंत्रणेला वेग आला असून शिवसेनेचे तीनही विधानसभा आमदार महायुतीच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत. भाजपा, शिवसेना, अप राकाँ व मित्रपक्षांच्या समन्वयातून महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्या विजयासाठी विविध स्तरांवर बैठका, संपर्क अभियान व मतदारांच्या भेटीगाठी सुरू करण्यात आल्या आहेत.
 
 
elckds
 
याच अनुषंगाने जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आनंद तिडके आणि बाबुराव कदम यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत महायुतीच्या विजयासाठी आखण्यात येणाèया रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांशी संपर्क वाढविणे, मतदारांपर्यंत शासनाच्या विकासकामांची माहिती पोचविणे आणि महायुतीची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे नियोजन करण्यात आले.
 
 
यावेळी महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर, नगरसेवक किशोर स्वामी तसेच तुळजेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित पदाधिकाèयांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपाकडून नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर राजूरकर यांच्या प्रचाराला अधिक गती मिळाली आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात सहभागी असून विविध भागांमध्ये सभा, बैठका आणि प्रत्यक्ष भेटीगाठींचे आयोजन केले जात आहे.
 
 
vidhan parishad nivadanuk  दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात महायुतीचे नेते व कार्यकर्ते निवडणुकीच्या कामात सक्रिय असून विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. महायुतीतील सर्व प्रमुख घटक पक्षांची एकजूट, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे महायुतीचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रचार मोहिमेला आणखी वेग देण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.