विप्लव बाजोरीया सर्वोच्च न्यायालयात
विधान परिषदेच्या अमरावती निवडणूक
दिनांक :08-Jun-2026
Total Views |
अमरावती,
viplav-bajoria : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी विपल्व बाजोरीया यांचा नामांकन अर्ज अवैध ठरविल्यानंतर या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेथील सुनावणीत त्यांना दिलासा मिळाला नव्हता. आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल केली आहे. ही याचिका सूचीबद्ध झाली आहे. त्यावर ९ किंवा १० जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. बाजोरीया यांचा अर्ज न्यायालयाने वैध ठरविला तर या निवडणुकीतली लढत काट्याची होऊ शकते. सर्वांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे.