संसार उमलण्यापूर्वीच कोमेजला
मारेगाव,
Newlywed couple commits suicide अंगावरची हळद पूर्णपणे निघालेली नव्हती, हातावरची मेंदी अजून सुकलेली नव्हती, जेमतेम संसार फुलायला लागला होता. लग्नाला केवळ एकच महिना झाला होता. परंतु कळी उमलण्यापूर्वीच दोघांनीही विहिरीत उडी घेत जीवन संपवले. तालुक्यातील सगनापूर येथील अंगावर शहारा आणणाèया या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
नव्याने पाहिलेली सुखी संसाराची स्वप्ने डोळ्यात साठवून हे दाम्पत्य जीवन जगू पाहत होते. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव जवळील सगनापूर येथे एका नवविवाहित पती-पतीने पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. आशिष धानोरकर आणि करिश्मा धानोरकर असे या दुर्दैवी जोडप्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण मारेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
आशिष आणि करिश्मा यांचा विवाह अवघ्या महिन्याभरापूर्वी, म्हणजेच 4 मे रोजी अत्यंत थाटामाटात पार पडला होता. घरात नवीन सून आल्याने आनंदाचे वातावरण होते. दोघेही सुखाने संसार करत होते. मात्र, 8 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हे दाम्पत्य दुचाकीने घरातून बाहेर पडले, ते परत कधी न येण्यासाठीच..!
पोटाला दगड बांधून मृत्यूला कवटाळले
घरातून निघाल्यानंतर त्यांनी गावालगत असलेल्या शेतातील एक विहीर गाठली. त्यांनी घेतलेला निर्णय इतका टोकाचा आणि भयानक होता की ऐकणाèयाच्याही अंगावर काटा येईल. विहिरीत उडी मारल्यावर मृत्यू निश्चित व्हावा आणि पुन्हा वर येता येऊ नये, म्हणून दोघांनीही आपल्या पोटाला दोरीने जड दगड बांधले आणि काळोख्या रात्री विहिरीच्या खोल पाण्यात उडी घेतली.
रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. गावालगतच्या विहिरीजवळ त्यांची दुचाकी उभी असलेली दिसल्याने गावकèयांना संशय आला. विहिरीत शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. हा विदारक देखावा पाहून त्यांच्या कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.
हसत्या-खेळत्या संसाराचा करुण अंत : कारण अस्पष्ट
Newlywed couple commits suicide घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिस ठाणेदार श्याम वानखेडे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्रीच दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले आणि उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. नुकतेच लग्न झालेल्या या हसत्या-खेळत्या जोडप्याने लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच असे कोणते दुःख मनात लपवून हा टोकाचा निर्णय घेतला, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मारेगाव पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून, सगनापूर गावासह संपूर्ण परिसर या दुर्दैवी घटनेमुळे सुन्न झाला आहे.