दिवसाढवळ्या घरफोडीचा आठवड्यात छडा

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
दोन घरफोडे, बॅटरी चोरीप्रकरणी दोन महिलांसह पाच जण गजाआड

वणी, 
Battery theft case शहरातील रामपुरा वॉर्ड परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीचा अवघ्या एका आठवड्यात छडा लावत वणी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन सराईत आरोपींना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेली 15 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तपासादरम्यान या दोघांविरुद्ध घरफोडीच्या आणखी एका प्रयत्नाचा गुन्हा उघडकीस आला. याच कारवाईदरम्यान पोलिसांनी बॅटरी चोरीचे प्रकरणही उघडकीस आणत दोन महिलांसह एकूण पाच आरोपींना अटक केली.
 
 
cori
 
रामपुरा वॉर्डातील देवराव नथ्थु जांभुळकर (वय 65) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी किचनच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून प्रवेश केला होता. त्यानंतर घरातील कपाट फोडून शेतीच्या मक्त्यातून आलेली 15 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविली. मिळालेल्या माहितीवरून सुमित राजू मानकर (वय 22) व राहुल उर्फ टिकल्या निलकंठ ठेंगणे (वय 32) दोघेही रा. रंगनाथनगर, वणी यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली.
 
 
चौकशीत दोघांनी घरफोडीची कबुली दिली. तसेच यापूर्वी घरफोडीचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्यांच्यावर दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण रोख रक्कम जप्त केली. संबंधित तिन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे. अल्पावधीत घरफोडीचा छडा लावत आरोपींना अटक करण्यात पोलिस पथकाला यश आल्याने त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात डीबी पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक सय्यद साजीद, गजानन सावसाकडे, मारोती पाटील, नीलकमल भोसले, गणेश मेश्राम, नंदकुमार पुष्पलवार, मोनेश्वर खंडरे, रितेश भोयर, शुभम किनाके, चैताली चेंडे व सहकाèयांनी यशस्वी केली.