Farm laborer dies of electric shock यावर्षी आधीच जिल्ह्यातील शेतकरी नापिकी, कर्जबाजारीपणा, वेळेवर पीक कर्ज न मिळणे, पावसाचे उशीरा आगमन, मालाला भाव नाही, अशा बाबींमुळे त्रस्त आहे. त्यातून सातत्याने शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. तर दुसरीकडे वीज प्रवाहसुद्धा शेतकèयांच्या मागे लागल्यासाखे वाटत आहे. तालुक्यात दहा दिवसात विविध घटनांमध्ये तीन शेतकèयांचा व एक शेतमजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लोणी शेतशिवारात शेतकरी सुभाष धोटे शेतात पेरणी करण्यासाठी गेले होते. बोअरवेलचा लोंबकळत असलेला सर्व्हिस केबल लाकडाला बांधण्यासाठी हातात पकडला असता लागलेल्या जोरदार झटक्यात शेतकरी सुभाष धोटे यांचा जागीच मृत्यू झाला. शिवर (भंडारी) येथे शेतकरी दिनेश परसराम जाधव (वय 36) हे शेतातील मोटारीची लाईन बंद करण्यासाठी गेले असताना शेतातील पेटीला त्यांचा स्पर्श झाला. या पेटीत विद्युत प्रवाह सुरू असल्याने दिनेश जाधव यांना जोरदार विजेचा धक्का बसला.
तिसèया घटनेत झटका मशिनवर पडलेली विद्यूत तार लक्षात न आल्यामुळे झटका मशिनला स्पर्श करताच आयूष मुंढेचा जागीच मृत्यू झाला. चवथ्या घटनेत जवळा येथील किसन टेकाम हे शेलू ब्राम्हणवाडा शिवारात संजय खंदार यांची शेती वहितिने करत होते. 7 जुलै रोजी शेतात बैलजोडी बांधत असताना विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
मगील काही दिवसात आर्णी तालुक्यातील तीन शेतकèयांचा व एक शेतमजुराचा वीज प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने शेतकèयांनी शेतात जातेवेळी स्वतःच्या जीवाची काळजी घेणे आवश्यक झाले आहे.