बैलजोडीच्या टंचाईमुळे पारवा परिसरात शेतकरी संकटात

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
डवरणीसाठी मोजावे लागतात दिवसाला 1200 ते 1500 रुपये

पारवा, 
Shortage of bullock pairs in Parva  घाटंजी तालुक्यात विशेषतः पारवा परिसरात सध्या खरीप हंगामातील शेतीकामांची लगबग सुरू आहे. मात्र, यंदा या भागात बैलजोडीच्या तीव्र टंचाईचा सामना शेतकèयांना करावा लागत आहे. पारवा, शरद या गावांसह संपूर्ण घाटंजी तालुक्यातील अनेक अल्पभूधारक व मध्यम शेतकèयांकडे स्वतःची बैलजोडी नसल्यामुळे पिकांच्या डवरणीसाठी मजुरीसह तब्बल 1200 ते 1500 रुपये प्रतिदिन या दराने बैलजोडी भाड्याने घ्यावी लागत आहे.
 
 
darvani
 
यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकèयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मजुरीसह भाड्यात मोठी वाढ घाटंजी तालुक्यात व पारवा परिसरात गेल्या काही वर्षांत चारा टंचाई व बैल सांभाळण्याचा वाढता खर्च यामुळे बैलजोडी राखणाèयांची संख्या झपाट्याने घटली आहे. सद्यस्थितीत डवरणीच्या कामासाठी मजुरासह बैलजोडीचे भाडे 1200 ते 1500 रुपयांवर पोहोचले आहे. कपाशी, सोयाबीन व तुरीच्या पिकांमधील तण काढण्यासाठी, पिकांना मातीचा भर देण्यासाठी डवरणी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे नाईलाजाने शेतकèयांना हा भारी खर्च सोसावा लागत आहे.
 
 
काही प्रमाणात शेतीचे यांत्रिकीकरण झाले असले, तरी कपाशी व तुरीसारख्या पिकांमध्ये अंतर्गत मशागत करताना रोपांचे नुकसान होऊ नये म्हणून आजही पारंपरिक बैलजोडीनेच डवरणी करणे योग्य मानले जाते. ट्रॅक्टरचा वापर सर्वच ठिकाणी शक्य नसल्याने संपूर्ण घाटंजी तालुक्यात व पारवा परिसरात सध्या बैलजोडीला प्रचंड मागणी आहे, परिणामी भाड्याचे दर गगनाला भिडले आहेत.

माझ्याकडे स्वतःची बैलजोडी नाही. कपाशी व सोयाबीनमध्ये डवरणी करणे गरजेचे आहे. दिवसाला 1500 रुपये भाडे देणे आम्हा गरीबांना परवडणारे नाही. शेतीचा खर्च इतका वाढलाय की लावलेला पैसा तरी निघेल की नाही याची चिंता वाटते.
महादेव कुडमते,
शेतकरी, पारवा ता. घाटंजी.

आम्हालाही जास्त भाडे आकारायला आवडत नाही. पण वर्षभर बैलांना सांभाळण्याचा, चाèयाचा व औषधोपचाराचा खर्च खूप वाढला आहे. त्यात डवरणीसाठी सोबत येणाèया मजुराची मजुरीही जोडावी लागते. हा सर्व खर्च पाहता 1200 ते 1500 रुपये घेतल्याशिवाय आम्हालाही परवडत नाही.
उमेश भोयर,
शेतकरी/बैलजोडी मालक, शरद, ता. घाटंजी