वणीतील वाहतूक कोंडीवर शिवसेना व मानवी हक्क सुरक्षा परिषदेचा आक्रमक पवित्रा

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
वन-वे पूर्ववत सुरू करण्यासह गांधी चौकात चारचाकींवर निर्बंधांची मागणी

वणी, 
Traffic Congestion in Wani शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आता विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर दबाव वाढविला आहे. शिवसेना व मानवी हक्क सुरक्षा परिषद यांनी स्वतंत्रपणे वाहतूक शाखेला निवेदने देत शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीच्या व कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी केली.
 
 
strafik
 
शिवसेनेच्या वतीने जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेला निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये कोविड काळात बंद करण्यात आलेली एकेरी वाहतूक व्यवस्था (वन-वे) तत्काळ पूर्ववत सुरू करावी, टिळक चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिस तैनात करावेत तसेच कामगार चौकात वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी वाहतूक चौकी उभारावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. शहरातील प्रमुख चौकांमधील सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अपघातांचा धोका व नागरिकांचा वाढता मनस्ताप लक्षात घेता प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
 
 
 
दरम्यान, मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने मंगळवारी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नरेश रणधिर यांना निवेदन देण्यात आले. गांधी चौकातील मोठी कमान परिसरात दर काही मिनिटांनी वाहतूक ठप्प होत असल्याने मोठी कमान ते टूटी कमान या मार्गावर चारचाकी वाहने व ऑटोरिक्षांचा प्रवेश नियंत्रित अथवा बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना विजय चोरडिया यांच्यासह दीपक कोकास, शुभम गोरे, वसुधा ढगे, मनीषा कोंगरे, भाग्यश्री वैद्य, सोनाली पुरी, हिमांशू बोहरा, शम सिद्दीकी, अनिल ढगे, अमृत पुरी, सुनील डोंगरे, राहुल उपाते, प्रज्योत ठावरी, राजू धावंजेवार, परशुराम पोटे, विकेश पानपाटे, सुमित्रा गोडे, मनिषा निब्रड, भाऊसाहेब आशुटकर, अजय चन्ने, सुनिता काळे, प्रमिला चौधरी, सुरेश बन्सोड, संजय चिंचोलकर, आकाश दुबे व अमोल कुमरे उपस्थित होते.