जनावरे रस्त्यावर सोडल्यास थेट जप्ती-नगराध्यक्ष कारू

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
उमरेड, 
Stray animal on the road शहरातील प्रमुख रस्ते, चौक व बाजार पेठेत मोकाट फिरणाऱ्या गायी व बैलांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.
 
 
umarkkhed
अनेक ठिकाणी ही जनावरे रस्त्यांच्या मधोमध किंवा सार्वजनिक ठिकाणी बसून राहतात. हॉर्न वाजवला तरी ती हलत नाहीत, परिणामी अपघाताचा धोका वाढतो. तसेच ही जनावरे सार्वजनिक ठिकाणी घाण करून अस्वच्छता निर्माण करतात. काही वेळा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांवर हल्ल्याच्या घटनाही घडतात. विशेषतः शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विद्यार्थी आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी नगर परिषद प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत असून, मोकाट जनावरे आढळल्यास त्यांची तात्काळ जप्ती करण्यात येईल. जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांची योग्य देखभाल करून त्यांना मोकाट सोडू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्राजक्ता कारू यांनी नागरिकांना केले.